रत्‍नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्‍नागिरी

Ratnagiri District Central Co-operative Bank Ltd., Ratnagiri

मुख्य कार्यालय : सहकार भवन, जवाहर पथ, रत्‍नागिरी ४१५६१२
फोन : 02352 - 222641/42/43

27

कर्ज योजना

कर्ज योजनांविषयी

तुमच्या भविष्यातील स्वप्नांना आर्थिक बळ !

आम्ही आपल्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी विविध प्रकारच्या सुलभ कर्ज योजना उपलब्ध करून देत आहोत. आमचे उद्दिष्ट पारदर्शक आणि जलद बँकिंग सेवा देणे हे आहे.

कमी व्याजदर
जलद मंजुरी
किमान कागदपत्रे
पारदर्शक व्यवहार

शेती व पीक कर्ज

खरीप हंगामासाठी पीक कर्ज (KCC)

सर्वसाधारण माहिती
  • पात्रता: प्राथमिक कृषी पत सहकारी संस्थेचे सभासद असणे आवश्यक

  • उद्देश: जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत खरीप हंगामाकरिता पीक कर्जे.

  • मुदत: १ वर्ष.

  • तारण: स्थावर मिळकत.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

रब्बी हंगामासाठी बागायती पीक कर्ज (KCC)

सर्वसाधारण माहिती
  • पात्रता: बागायती शेती असणे आवश्यक

  • कर्ज प्रमाण (झाडांच्या संख्येनुसार):

    • आंबा पीक: १०० झाडे असल्यास रु. २,७५,०००/-

    • काजू पीक: २०० झाडे असल्यास रु. १,६५,०००/-

    • नारळ पीक: १७५ झाडे असल्यास रु. १,२०,०००/-

    • सुपारी पीक: १३५८ झाडे असल्यास रु. ७५,०००/-

  • तारण: स्थावर मिळकत.

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

किसान क्रेडिट कार्ड योजना (पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाकरिता)

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाकरिता खेळते भांडवल कर्ज उपलब्ध 

  • वैशिष्ट्ये : शेतीकरिता व शेतीसमवेत पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना रु. ३,००,०००/- पर्यंत ६% व्याजदराने व केवळ पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाकरिता रु. २,००,०००/- लाखापर्यंत सदरचे कर्ज ७% व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. 

  • व्याज परतावा : मुदतीमध्ये व्याजासह मुद्दल परतफेड करणाऱ्या सभासदास केंद्रशासन व राज्य शासन यांचेमार्फत वरीलप्रमाणे आदा करणेत आलेले व्याज व्याजपरताव्याद्वारे दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

दुभती जनावरे खरेदी कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज प्रमाण: नाबार्ड युनिट कॉस्टप्रमाणे कर्जपुरवठा

  • कर्ज मर्यादा: प्रति मुऱ्हा/म्हैसाणा म्हैस - रु. १,५०,०००/- पर्यंत कर्ज सहाय्य

  • मुदत: ५ वर्षे

  • तारण: दोन सक्षम जामीन व स्थावर मिळकत

  • विशेष अट: तसेच ५ व १० जनावरांसाठी प्रकल्पअंतर्गत कर्जपुरवठा

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा/प्रकल्प अहवाल
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

शेळी पालन कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज प्रमाण: नाबार्ड युनिट कॉस्टप्रमाणे कर्जपुरवठा

  • युनिट प्रकार: शेळ्या युनिट- ५+१ / १०+१ / २०+१ / ५०+२ बोकड.

  • प्रकल्पानुसार स्थानिक प्रति शेळी: रु. ८,०००/- व बोकड - रु. १०,०००/-

  • उस्मानाबादी प्रति शेळी: रु. १०,०००/- व बोकड - रु. १२,०००/-

  • मुदत: ७ वर्षे

  • तारण: दोन लायक जामीन व स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

कुक्कुटपालन व्यवसाय कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज प्रमाण: नाबार्ड युनिट कॉस्टप्रमाणे कर्जपुरवठा.

  • प्रकल्प प्रकार व मर्यादा:

    • पोल्ट्री (१००० पक्षी) लेअर पक्षी - रु. ८,७२,९५०/-

    • पोल्ट्री (५००० पक्षी) ब्रॉयलर पक्षी (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) - रु. १२,०७,६३५/-

    • पोल्ट्री (५००० पक्षी) ब्रॉयलर पक्षी - रु. १८,९९,१९६/-

  • मुदत: ७ वर्षे

  • तारण: दोन लायक जामीन व स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

बैलगाडी खरेदी कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज प्रमाण: नाबार्ड युनिट कॉस्टप्रमाणे कर्जपुरवठा

  • मर्यादा: ८ क्विंटल क्षमता रु. २०,०००/-, ५ क्विंटल क्षमता रु. १६,०००/-

  • मुदत: ७ वर्षे

  • तारण: दोन लायक जामीन व स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

रोपवाटिका/नर्सरी कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: प्रकलपानुसार हापूस आंबा कलमे, काजू कलमे, चिकू कलमे इ. रोपांसाठी कर्ज सहाय्य

  • मुदत: १८ ते ४२ महिने

  • तारण: स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
शेती 7/12 उतारा
प्रकल्प अहवाल

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

कृषी यांत्रिकीकरण कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: ट्रॅक्टर, औजारे, पॉवर टिलर, भातमळणी यंत्र खरेदीकरिता कर्ज

  • मुदत: ६ ते ९ वर्षे

  • कर्ज प्रमाण: कोटेशनच्या ८५ टक्के कर्ज

  • स्वगुंतवणूक: १५ टक्के

  • तारण: स्थावर मिळकत

  • जमीन क्षेत्र आवश्यकता:

    • ट्रॅक्टरकरिता किमान बारमाही पाण्याखालील ८ एकर क्षेत्र आवश्यक

    • पॉवर टिलरकरिता किमान बारमाही पाण्याखालील ४ एकर क्षेत्र आवश्यक

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
शेती 7/12 उतारा
दरपत्रक

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

नवीन विहीर बांधणी/पुनर्बांधणी, खोदाई/पंपहाऊस/ठिबक सिंचन योजना

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज सहाय्य (विहीर): नवीन विहीर बांधणी / खोदाई करता रु. २,३६,०००/-

  • कर्ज सहाय्य (पंप): २, ३, ५, ७.५ अश्वशक्तीच्या (HP) पंपांसाठी कोटेशनच्या ७५ टक्के व पंप हाऊस बांधकामासाठी कर्ज

  • ठिबक सिंचन: ठिबक सिंचनासाठी नाबार्डच्या (NABARD) युनिट कॉस्टप्रमाणे कर्ज

  • तारण: स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
शेती 7/12 उतारा
दरपत्रक

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

फळबाग लागवड योजना

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: प्रकल्पानुसार आंबा, काजू व नारळ या फळझाडांच्या लागवडीसाठी दीर्घ मुदतीने कर्जसहाय्य

  • कर्जाची मुदत: कमाल १५ वर्षे

  • तारण: स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
शेती 7/12 उतारा
प्रकल्प अहवाल

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

गृह कर्ज

गृहकर्ज योजना

सर्वसाधारण माहिती

1.उद्देश: नवीन घरबांधणी, सदनिका खरेदी

  • कर्ज मर्यादा: वेतनेतर / वेतनदार व्यक्तीसाठी वैयक्तिक कर्ज मर्यादा रु. ७५.०० लाख (थेट स्वरूपात एस्टिमेटच्या ९०:१० प्रमाणात)
  • मुदत: जास्तीत जास्त २४० महिने (समान मासिक हप्त्याने परतफेड)
  • तारण: सदनिका / घर (तारणामध्ये कर्जातून निर्माण होणाऱ्या जिंदगीचा समावेश राहील)  

2. उद्देश: घर दुरुस्ती कर्ज

  • मर्यादा: घरदुरुस्तीसाठी रु. ५.०० लाखापर्यंत
  • कर्ज मुदत: जास्तीत जास्त ६० महिने (समान मासिक हप्त्याने परतफेड)
  • तारण: घर (तारणामध्ये कर्जातून निर्माण होणाऱ्या जिंदगीचा समावेश राहील

3. उद्देश: जुने घर व सदनिका खरेदी कर्ज (१५ वर्षांचे आतील बांधकामासाठी कर्जपुरवठा)

  •  कर्ज मर्यादा: वेतनेतर / वेतनदार व्यक्तीसाठी वैयक्तिक कर्ज मर्यादा रु. ७५.०० लाख  
  • मुदत: बांधकामाचे वर्ष विचारात घेऊन जास्तीत जास्त २४० महिने (समान मासिक हप्त्याने परतफेड)
  • तारण: सदनिका /घर (तारणामध्ये कर्जातून निर्माण होणाऱ्या जिंदगीचा समावेश राहील)
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
साठे खत
खरेदीखत
दरपत्रक

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

वाहन कर्ज

दोन चाकी / चार चाकी वाहन खरेदी योजना

सर्वसाधारण माहिती
  • पात्रता: डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार व सधन शेतकरी यांना स्वतःचे वापरासाठी वाहन खरेदी कर्जसुविधा

  • कर्ज प्रमाण: कोटेशनच्या ९०%

  • मुदत: ३६ ते ८४ महिने

  • तारण: कर्जातून खरेदी केलेले वाहन

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
पॅन कार्ड
वाहनाचे दरपत्रक

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

शैक्षणिक कर्ज

शैक्षणिक कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • देशांतर्गत शिक्षण: शैक्षणिक खर्चाचे ८५% व कर्जाची कमाल मर्यादा रु. १५.०० लाख

  • परदेशी शिक्षण: शैक्षणिक खर्चाचे ८५% व कर्जाची कमाल मर्यादा रु. ३०.०० लाख

  • कर्जाचा कालावधी: शैक्षणिक कालावधी धरून जास्तीत जास्त १० वर्षे

  • परतफेड मुदत: शिक्षण पूर्ण झाल्यावर १ वर्ष कालावधीने ६० समान मासिक हप्त्याने परतफेड

  • तारण: स्थावर मिळकत.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
कॉलेज प्रवेश पत्र
पालकांचे पॅन कार्ड
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

सोने तारण कर्ज

सोनेतारण कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • व्यक्तिगत कर्ज मर्यादा: रु. २०,००,०००/-

  • कर्जाची मुदत: १ वर्ष

  • वैशिष्ट्ये: किफायती व्याजदर व सोने तारण ऐवजाची पूर्ण सुरक्षिततेची हमी

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

वैयक्तिक कर्ज

पगार तारण कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • पात्रता: जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, कायम कर्मचारी यांना तसेच या बँकेमार्फत वेतन वितरीत होणारे जिल्ह्यातील कोकण रेल्वे कर्मचारी व नामवंत कंपन्यांचे कायम कर्मचारी यांना त्यांचे मासिक वेतनातून होणारी सर्व प्रकारची कपात विचारात घेऊन मिनिमम वेजेस अ‍ॅक्टनुसार (किमान वेतन कायदा) ६०% कपातीचे मर्यादेपर्यंत कर्ज देणेत येईल

  • मुदत: कमाल १० वर्षे अथवा कर्जदार/जामिनदार यांचे निवृत्तीचे तारखेचे ३ महिन्यांपर्यंत यांमध्ये जो कालावधी कमी असेल त्या मुदतीइतकी. कर्ज परत फेड समान मासिक हप्त्याने

  • तारण: कर्जदार व जामिनांचे वेतन

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

शहरी/ग्रामीण वैयक्तिक कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • माहिती / उद्देश: शेतकरी, व्यावसायिक, पगारदार व्यक्तींना व्यवसायासाठी व घरगुती कारणासाठी थेट स्वरूपात तसेच संस्थेमार्फत रु. १.०० लाख ते २.०० लाख मर्यादेपर्यंत कर्ज

  • मुदत: ३ ते ५ वर्षे (समान मासिक परतफेडीचे हप्ते)

  • जामिनदार: २ सक्षम लायक जामीनदार

  • तारण: घरपत्रक उताऱ्यावर कर्ज बोजा नोंद

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

गृहनिर्माण सहकारी संस्थांकरिता कर्ज

गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांचे उपक्रमासाठी कर्ज

सर्वसाधारण माहिती

उद्देश: गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या स्वतःचे उपक्रमाकरिता कर्ज :-
१) संस्थेचा स्वतःचा मिटींग हॉल/कार्यालय इमारत बांधणे
२) संस्थेच्या मालकीच्या मालमत्तेस कंपाऊंड वॉल बांधणे
३) संस्थेच्या सदनिकाधारक सभासदांच्या वाहनांसाठी पार्किंग शेड बांधणे व टेरेस शेड उभारणे
४) सभासदांसाठी पाण्याची टाकी, पाईपलाईन पंपसेट, मशिनरी खरेदी करणे
५) संस्थेच्या पहाऱ्यासाठी चौकी बांधणे
६) संस्थेच्या मालकीच्या क्षेत्रात भाडेतत्त्वावर देणेसाठी दुकानागाळे बांधणे
७) सोलर युनिट खरेदी करून देणे
८) लिफ्ट बांधणी / नविन लिफ्ट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे
९) उच्च प्रतीचे लिफ्ट बॅकअप युनिट खरेदी करणेकरिता कर्ज उपलब्ध करून देणे
१०) पाण्याचे मुख्य स्त्रोत उपलब्ध होणेसाठी अतिरिक्त विहीर / बोअर विहीर बांधणे
११) इमारतीचे आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देणे 
१२) इमारतींना वॉटर प्रुफिंग करणे, रंगकाम करणे
१३) संस्थेच्या आवश्यकतेनुसार व मागणीनुसार अनुषांगिक खर्चकरीता कर्ज उपलब्ध करून देणे

आवश्यक कागदपत्रे
संस्थेचे पत्र
संस्थेचा ठराव
सर्वसाधारण माहिती
संस्थेची आर्थिक पत्रके
दरपत्रक
संस्था नोंदणी प्रमाणपत्र

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

गृहनिर्माण सहकारी संस्थेला सोलर युनिट खरेदीकरीता कर्ज

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज प्रकार: मध्यम मुदत बिगर शेती कर्ज

  • कर्ज प्रकार कालावधी: कमाल ५ वर्षे

  • कर्ज मंजुरीचे प्रमाण: कोटेशनचे कमाल ७५%

  • व्याजदर: ९%

  • तारण: संस्थेच्या बँकेकडील एकूण ठेवीचे ७५% मर्यादित कर्ज मर्यादा असल्यास त्या संस्थेला सिंकिंग फंड, मुदत ठेवीचे तारणावर तसेच कर्ज मंजुरीतून निर्माण होणारी सर्व साधन सामुग्री तारण घेऊन कर्ज मंजूर करणेत येईल. तसेच ज्या संस्थांकडे आवश्यक ठेवी उपलब्ध नसतील अशा संस्था तारण देत असलेली किमान दुप्पट मूल्यांकनाची स्थावर मालमत्ता तसेच कर्जातून निर्माण होणारी सर्व साधन सामुग्री तारण घेऊन कर्ज मंजूर करणेत येईल

आवश्यक कागदपत्रे
संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
वार्षिक सभेचा ठराव
दरपत्रक
संस्थेची आर्थिक पत्रके

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

गाळा खरेदी - बांधणी कर्ज

स्वतःचे व्यवसायासाठी गाळा खरेदी करणेकरिता तसेच गाळ्याचे बांधकाम करणेकरिता कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • कर्ज प्रकार: मध्यम मुदत बिगर शेती (केवळ थेट कर्ज) 

  • कर्ज परतफेड कालावधी: सवलतीचा कालावधी ६ महिने सह परतफेड कालावधी ७ वर्षे

  • बँक मर्यादा: प्रकल्प किमतीच्या ७५% पर्यंत

  • कर्ज मर्यादा: कमाल रु. ४०.०० लाख

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
प्रकल्प अहवाल

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

कॅश क्रेडिट कर्ज

कॅशक्रेडिट कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: उद्योगाची उलाढाल, उत्पादन चक्र लक्षात घेऊन घाऊक विक्रेते, व्यापारी, ठेकेदार यांना कॅश क्रेडिट स्वरूपात कर्जसहाय्य

  • पात्रता: जिल्ह्यातील कायम रहिवाशी असणे आवश्यक

  • मार्जिन: शिल्लक मालाचे किमतीचे ४०% दुरावा (मार्जिन)

  • मुदत: १ वर्ष

  • तारण: स्थावर मिळकत

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक स्टेटमेंट
उत्पन्नाचा दाखला

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

स्थावर स्थिर मालमत्ता तारण कर्ज

स्थावर / स्थिर मालमत्ता तारणावर कर्ज

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश व पात्रता: जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना त्यांचे व्यवसाय वृद्धीसाठी / व्यवसायाच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी / जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मालमत्ता खरेदीसाठी कर्ज

  • कर्ज प्रमाण: जिल्ह्यातील स्थळमालकीचे स्थावर/स्थिर मालमत्तेचे तारणावर मालमत्तेचे ठिकाण व विक्री योग्यता विचारात घेऊन मालमत्तेचे मूल्यांकनाचे ७०% व जास्तीत जास्त रु. ६०,००,०००/- मर्यादेपर्यंत कर्ज

  • आवश्यक कागदपत्रे: वेतन दाखला व व्यवसायिकांचे बाबतीत आयकर विवरण पत्रके व आर्थिक पत्रकांनुसार कर्ज परत फेड क्षमता विचारात घेऊन कर्ज मंजुरी

  • मुदत: ३ ते १० वर्षे

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

इतर कर्ज योजना

दुग्ध समृद्धी कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: जिल्ह्यातील संकलित होणाऱ्या दुधाचे अनुषंगाने दुग्ध प्रक्रिया उद्योगास चालना देणेकरिता व जिल्ह्यातील तरुणांना उद्योगमुख करणेकरिता बँकेमार्फत लघु उद्योगांना कर्ज पुरवठ्याचे धोरणांतर्गत दुग्ध समृद्धी कर्ज योजना कार्यान्वित करणेत आली आहे. सदर योजनेअंतर्गत संस्थे स्वतःचे उपक्रमाकरिता अथवा संस्थेमार्फत सभासदांना दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करणेकरिता कर्ज वितरण केले जाते

  • व्याजदर: संस्थेला ७% व थेट सभासदाला ९%

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
शेती 7/12 उतारा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

सहलीसाठी कर्ज योजना

सर्वसाधारण माहिती
  • पात्रता व उद्देश: देशांतर्गत व देशाबाहेरील सहलीसाठी विविध टूर कंपन्यांमार्फत जाहीर केलेल्या टूर पॅकेजच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातील व नामांकित कंपनीतील कर्मचाऱ्यांकरिता त्यांच्या मासिक वेतनाचे आधारावर कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाते

  • कर्ज मर्यादा: रु. २,००,०००/- पर्यंत

  • मुदत: २४ महिने

  • व्याजदर: ११%

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
दरपत्रक

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

मच्छिमार व्यवसायाकरिता कर्ज

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश व मर्यादा:

    • मच्छिमार व्यवसायिकांना होड्या, जाळी व अन्य मच्छिमार साहित्याची खरेदी व दुरुस्तीकरिता १ वर्ष अल्प मुदतीचे रु. १०,०००/- पर्यंत कर्ज

    • यांत्रिक नौकांची दुरुस्ती व मच्छिमार साहित्य खरेदी करिता रु. १.०० लाख मर्यादेपर्यंत १ वर्ष अल्पमुदतीचे कर्ज

    • शासन पुरस्कृत ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत कर्ज

    • यांत्रिक नौका बांधणे/खरेदी,  तसेच इंजिन,सुटे भाग,मासेमारी उपकरणे,मासेमारी जाळे खरेदी करण्याकरिता प्रकल्प खर्चाचे ७५ टक्के कर्ज, कमाल १० वर्षे मुदत

    • डिझेल खरेदी-विक्री करिता मच्छिमार संस्थांना कॅश क्रेडिट कर्ज 

  • तारण: कर्जातून खरेदी / निर्माण होणारी यांत्रिक नौका व स्थावर मिळकत

  • गोड्या/खाऱ्या पाण्यातील कोळंबी/मत्स्य संवर्धन व्यवसायाकरिता: प्रकल्प खर्चाचे ७५ टक्के कर्ज

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
नौका नोंदणी प्रमाणपत्र

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

कृषी व ग्रामीण पर्यटन विकास योजना

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश: योजनेअंतर्गत घरगुती निवासस्थाने, हॉटेल्स, निवास व नाश्त्याची व्यवस्था इ. पर्यटनाशी निगडित सेवा उद्योगासाठी कर्ज सुविधा

  • मुदती कर्ज वैयक्तिक कर्जमर्यादा: रु. ६०.०० लाख

  • मुदत: ३ ते १५ वर्षे (परतफेड समान मासिक हप्त्याने)

  • तारण: स्थावर मालमत्ता

आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
शेती 7/12 उतारा
प्रकल्प अहवाल

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

गणपती मूर्तीकारांना मूर्तीकामाकरिता कर्ज

सर्वसाधारण माहिती
  • उद्देश व मर्यादा: गणपती मूर्तीकारांना साचे व अन्य मशनरी खरेदीकरिता रु. ५.०० लाख म.मु.बि.शेती कर्ज, माती/रंग/अन्य साहित्य खरेदी करिता रु. २.०० लाख अ.मु.बि. शेती कर्ज

  • मुदत: १ वर्ष ते ५ वर्षे

  • तारण: रु. १.०० लाख कर्जाकरिता घरपत्रक उताऱ्यावर बोजा नोंद व रु. १.०० लाख वरील कर्जासाठी सभासदाची दुप्पट मूल्यांकनाची स्थावर मालमत्ता

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा

* टीप: वरील कागदपत्र यादी व माहिती प्राथमिक असून, अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

मासिक हप्ता कॅल्क्युलेटर

%
Yr
सर्वसाधारण माहिती
एकूण कर्ज रक्कम ₹0
एकूण देय व्याज ₹0
एकूण देय रक्कम ₹0
मासिक हप्ता

₹0

मुद्दल
व्याज
: